भोर नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आदोलन

भोर -महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत कामगार कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे (दि. 9) ऑगस्ट या क्रांतीदिनी भोर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले, अशी माहिती पुणे जिल्हा समन्वय समितीचे सचिव विठ्ठल करंजे यांनी दिली.
राज्य शासनाकडे समन्वय समितीच्या माध्यमातून 16 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच सातवा वेतन आयोग लागू करावा. हंगामी व कंत्राटी कामगारांना शासनाचे सेवेत कायम करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करावी, सफाई कामगारांना मोफत घरे द्यावीत आदी 16 मागण्यांचा यात समावेश आहे. दि. 10 ते 14 तारखेपर्यंत सर्व कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तर त्यानंतर प्रत्येक पालिका क्षेत्रातील आमदार, खासदार, मंत्री, राज्य मंत्री यांच्याकडे कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. तर (दि. 21) ऑगस्टपासून राज्यभरातील कामगार कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा विठ्ठल करंजे यांनी यावेळी शासनास दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)