भोर दऱ्यात 70 वर्षानंतर आले पाणी

धनगर समाज बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रु

भोर- शहरापासून सुमारे अडीच किलो मीटर अंतरावर असणाऱ्या व डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या भोर दऱ्याला स्वातंत्र्यानंतर सुमारे 70 वर्षांनी बोरवेलचे पाणी मिळाले आहे. पाणी पाहून तेथे वर्षानुवर्षे रहाणाऱ्या धनगर समाजातील महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.
भोर नगर पालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका खजिनदार यशवंत डाळ व त्यांचे सहकारी दत्तात्रय बांदल यांनी अवघड जागी बोअरवेलची यंत्रणा नेऊन बोअर घेतली. बोअरला पाणी लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. भोर दऱ्यातील सुमारे 120 नागरिकांची ही वस्ती असून ती भोर नगरपालिका हद्दीत येते. बोअरचे पाणी नव्हते तेव्हा महिलांना सुमारे अडीच किलो मीटरवरून पाणी आणावे लागत असे व त्यातच त्यांचा दिवसाचा वेळ खर्ची पडत असे. भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी यशवंत डाळ यांनी धनगरवस्तीला पाणी देण्याचे आश्वासने दिले होते. ते पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)