भोर तालुक्‍यात भात लावणी अंतिम टप्प्यात

जोगवडी- भोर तालुक्‍यात एक जुलैपासून सततधार पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, चवळी, भुईमूग या पिकांना संजीवनी मिळाली. या भागात भात मुख्य पीक असून तालुक्‍यामध्ये दमदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाची भात लावणीसाठी लगबग चालू असून, भात लावणी अंतिम टप्प्यात आली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. यावेळेस वादळासह पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले होते, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीपूर्व कामे आटोपली होती; परंतु पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, 1 जुलैनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने भुईमूग, घेवडा, चवळी, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळाली. दमदार पावसाने हजेरी लावल्याने भात खाचऱे वाहू लागली होती. भात रोपेही तरारली असल्याने शेतकरी वर्गाची लावणीची लगबग चालू असून, भात लावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे
भोर तालुक्‍यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध असून, याबरोबरच कोलम, बासमती आणि इतर सुधारित संकरित रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. भात लागवडीच्या अगोदर पूर्वीच्या काळी शेतकरी वर्ग सर्रास बैलजोडीने चिखल करीत होता; परंतु अलीकडच्या काळात बैलजोडीने चिखल करण्यापेक्षा ट्रॅक्‍टरने चिखल करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. भोर तालुक्‍यात सुमारे 7 हजार 400 हेक्‍ट्रवर भाताची लागवड करण्यात येत असून, आतापर्यंत 85 टक्के भात लागवड झाली आहे.

  • दरवर्षी आम्ही इंद्रायणी भाताचे पीक घेत असून, या वर्षीही आमच्या सर्व क्षेत्रात इंद्रायणी भात लागवड केली आहे. यावर्षी वेळेवर व मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने आम्ही भात लागवड वेळेवर केलेली आहे. भाताचे पीक दरवर्षीच्या तुलनेने जास्त होण्याची शक्‍यता आहे.
    – किरण यादव, शेतकरी, संगमनेर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)