भोर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर

  • पहिल्या टप्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस यांची निवड

भोर – भोर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात दोन उपाध्यक्ष आणि चार सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यात कार्यकारीणीच्या इतर पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष केतन चव्हाण यांनी दिली.
उपाध्यक्षपदी सुरज दत्तात्रय कोंडे (केळावडे) आणि राहूल गोविंद गाडे (कापुरहोळ), यांची तर सरचिटणीसपदी चंद्रकांत सोमनाथ भोरडे (वरवे), पंकज धनाची गाडे (हरिश्‍चंद्री) आणि गोविंद बाजीराव लोळे (सांगवी बु.), नवनाथ तानाजी चव्हाण, सरचिटणीस (कुरंगवाडी) यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना निवडीचे पत्र भोर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे, जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी उपसभापती विक्रम खुटवड, शहराध्यक्ष नितीन धारणे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रकाश तनपुरे, राष्ट्रवादी विद्याथॅ कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल कोंडे, युवकाध्यक्ष गणेश खुटवड, सुहित जाधव, राजू खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)