भोर कुपोषण मुक्तच्या कार्यशाळा सुरू

भोर- भोर तालुका कुपोषण मुक्त करण्याच्या संकल्पानुसार पहिली कार्यशाळा भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.
या वेळी भोर तालुका पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्या पुनम पांगारे, महिला बाल कल्याणच्या साबणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल राठोड, डॉ. समिक्षा शिंदेगळवेकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे, सुरेश निगडे, भोंगवली ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम उल्हाळकर यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, परिचारीका उपस्थित होते.
यावेळी भोंगवली पंचक्रोशितील 126 अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ञ डॉ. मनोज गोंडाणे यांनी आवश्‍यकता असलेल्या सॅम व मॅमच्या 16 बालकांना ओरोफर एक्‍स टी, मॅकेलव्हीट प्लस सिरप, वायसिनरल या औषधांचे वाटप केले. यातील सॅमच्या तीव्र कुपोषीत असलेल्या दोन बालकांचे पालकत्व जि.प.सदस्या शलाका कोंडे यांनी स्विकारले आहे. भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एकही बालक कुपोषीत राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे कोंडे यांनी सांगितले. या वेळी कुपोषीत आंगणवाडी बालकांना सुशांत मोहिते यांनी शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप केले. प्रास्ताविक डॉं.अनिल राठोड यांनी केले. सुत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले. सुरेश निगडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)