भोर उपवन विभागामार्फत पाच लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प

भोर- जागतिक तापमान वाठढीची तीव्रता आणि परिणामकारकता कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात 1 जुलै ते 31 जुलै या कालावधित हा वृक्ष लागवाड उपक्रम यशस्वी करावयाचा असून, भोर उपवन विभागामार्फत 463 हेक्‍टर क्षेत्रावर 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, यातील भोर वन परिक्षेत्रात 1 लाख 59 हजार 500, नसरापूर वन परिक्षेत्रात 1 लाख 12 हजार 275, सासवड वन परिक्षेत्रात 2 लाख 4 हजार 800, तर वेल्हा वन परिक्षेत्रात 25 हजार 300 आवळा, जांभूळ, सीताफळ, बांबू, हिरडा, गुलमोहर, चिंच, वड, पिंपळ, फणस, साग आदी रोपांची लागवड करण्यात येणार असून, वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ भोर तालुक्‍यातील वीसगांव खोऱ्यातील हातनोशी येथे आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते रविवारी (दि.1 जुलै) करण्यात येणार असल्याची माहिती भोरच्या उपविभागीय वनाधिकारी ए. जी. भोंग यांनी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)