भोरवाडीत 16 जुगारींवर कारवाई

1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त

नारायणगाव -येथील पोलिसांनी वडगाव कांदळी परिसरातील भोरवाडी येथे एका उसाच्या शेतात एका बाभळी खाली जुगार खेळणाऱ्या 16 जणांवर कारवाई करून 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे
25 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भोरवाडी ते साळवाडी रोडला जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून या कारवाईत 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी, 10 हजार 380 रुपये रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी पत्याचे कॅट असे एकूण 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केले आहेत. अनिल राजाराम धोत्रे, कुशाबा देवराम निरगुडे, पुरणमल भगवान शिंदे, पांडुरंग किसन करपे, सुरेंद्र रामदास नाटे, रोहिदास रघुनाथ मुटके, पोपट बाळू थोरात, संदीप नामदेव पाचपुते, शंकर बबन मुटके, रंगनाथ भगवंत पवार, रोहिदास कचरू काटे, शेषराव कोंडीराम खर्चन, सोनू काशिबा पाचपुते, सचिन काकासाहेब खर्चन, सारंग अंबादास तायडे, पराग मनसुख बांगर यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा 12 अ नुसार कारवाई करण्यात आली आहे. फिर्याद पोलीस नाईक भीमा लोंढे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)