भोरवाडीच्या बीरदेव महाराजांचा आजपासून उत्सव

ओझर- भोरवाडी (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत बिरदेव महाराज यांचा मंगळवारी (दि. 19) वार्षिक यात्रोत्सव साजरा होणार असून, या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बिरदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास भोर यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष सयाजी भोर यांनी सांगितले की, माघ पौर्णिमेला ग्रामदैवत बिरदेव महाराजांची यात्रा सुरू होते. या दिवशी त्रंबकेश्वर येथून पाण्याच्या कावडी घेऊन आलेले ग्रामस्थ, ट्रस्टचे सदस्य, ग्रामस्थ व मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 ते 7 या वेळेत बिरदेव महाराजांना जलाभिषेक करून विधिवत पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. संगमनेर तालुक्‍यातील मूळ ठाण असलेल्या साकुर येथून देवाचे फुल (प्रसाद) घेऊन आलेल्या रथाची टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात सकाळी सात वाजता मिरवणूक काढण्यात योते. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होऊन रथ पुन्हा मंदिर प्रांगणात आणला जातो. यावेळी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हभप कैलास महाराज जंजिरे यांचे काल्याचे कीर्तन होऊन येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता देवास दंडवते, सायंकाळी सहा वाजता बिरदेव महाराजांच्या काठीची मिरवणूक, सायंकाळी सात वाजता शेरण्या आणि बीरदेव महाराजांचा खेळ होईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)