भोरला अवकाळी पावसाने झोडपले

भोर-शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. वीज पडून नारळाचे झाड पेटले. तर आंब्याचे बागांचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान नुकसान झाले.
सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक सुरू झालेला विजांचे कडकडाट, वादळी वारे आणि अवकाळी झालेल्या मुसळधार पावसाने भोर शहर आणि परिसराला चांगलीच त्रेघातिरपीट उडाली. सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत सुरू झालेल्या जोराच्या पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भोलावडे, किवत, बसरापूर आणि भोर शहरानजीक असलेल्या आंब्यांचे बागांतील लगडलेल्या आंब्याचा अक्षशाः सडाच पडल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने शेतातील, घरांजवळील मोठमोठाली झाडे पडून जमीनदोस्त झाली. तर भोर शहरातील एका घरासमोरील नारळाचे झाडावर कडकडणाऱ्या वीजेचा लोळ पडून नारळाचे उभ्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली. दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळच्या वेळी आभाळ ढगांनी भरुन आले आणि वादळी वारे आणि विजांच्या कडकडात मुसळधार अवकाळी पावसाने अखेर हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसाने लोकांची चांगलीच धांदल उडवली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून घरात सर्वत्र पाणीच पाणी होऊन घरगुती सामानाचे भिजून मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानिचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. भुईमुगाचे उन्हाळी पिकास मात्र हा पाऊस वरदान ठरला असल्याचे शेतकरी बोलत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)