भोरमध्ये स्वच्छता पंधरवड्यात उत्साहात

भोर- येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवड्यात महाविद्यालयातील 150 एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी शहरात स्वच्छता फेरी काढून नगरपालिका परिसर, वाघजाई मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, संजय नगर, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय (रामबाग), राजवाडा चौक, एसटी आगार, चौपाटी शेटेवाडी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसर, महात्मा फुले भाजी मंडई परिसराची चकाचक करण्यात आला, अशी माहिती एन.सी.सी.चे सीटीओ प्रा. संदीप उल्हाळकर यांनी दिली. या उपक्रमाचे उद्‌घाटन महिला पोलीस नाईक प्रमिला निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, एन.सी.सी.च्या विभागप्रमुख सावित्री साळुंके आदी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाचे आयोजन केल्याबद्दल राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष अनंत थोपटे व कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)