भोरमध्ये साहित्य संमेलन कार्यालयाचे गुरुवारी उद्‌घाटन

भोर-येथे दि. 23 व 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 17) ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली. यानिमित्त सौ गं.पं.वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव अजित अभ्यंकर हे उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रा. डॉ. विजय खरे यांचे मार्गदर्शन पर “जागतिक राजकारणातील भारत, जात, वर्ग, धर्म, क्रांतिकारक, राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हाने’ या विषयावर सखोल प्रबोधनात्मक विचार ते यावेळी मांडणार आहेत. समाजातील सर्व घटकांतील विजारवंत व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)