भोरमध्ये शांततेत मोर्चा

भोर- राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु असतानाच आज मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने भोर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणी साठी शांततेत मोर्चा काढुन आंदोलन करण्यात आले.
मराठा मोर्चाचे हजारो कार्यकर्ते चौपाटी (शेटेवाडी) येथील शिवरायांचे पुतळ्याजवळ सकाळी 09.00 वाजता एकत्र आले. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन व अभिवादन करुन मोर्चास सुरुवात झाली. शेटेवाडी, भोर नगरपालिका मार्गे नवी आळीतून सम्राट चौकातील क्रांती स्तंभास पुष्माला अर्पण करुन मोर्चा राजवाडा चौकात येऊन स्थिरावला. या वेळी मोर्चात संग्राम थोपटे यांच्यासह तालुक्‍यातील सर्वच राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते.
यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात अनेकांनी आपली मते व्यक्त करुन मराठा समाजाला आरक्षणाची जोरदार मागणी केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाला भोर शहरातील सर्वच स्तरातील छोट्या मोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला. भोर शहरात कडकडीत बंद पाळून आंदोलन यशस्वी करण्यात आले.
भोर एसटी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानाकात सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील पेट्रोल, डिझेल पंपही बंद होते. पोलिस निरिक्षक पांडूरंग सुतार आणि उप पोलिस निरिक्षक नंदकुमार तडाखे व सहकारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)