भोरमध्ये ढोल ताशांचा गजरात बाप्पांना निरोप

भोर- जय हनुमान गणेश मंडळ भेलकेवाडी, जवाहर तरुण मंडळ शेटेवाडी (चौपाटी), विट्टल मंदिर गणेशोत्सव मंडळ भेलकेवाडी, सावता माळी गणेश मंडळ भोरेश्वर नगर, तुफान मित्र मंडळ चौपाटी रोड आणि नवी आळी गणेशोत्सव मंडळ या सहा गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर फुलांची आणि गुलालाची उधळण करीत भोर नगरपालिका चौकापासून सुरु झाल्या. यावेळी जय हनुमान मित्र मंडळ भैलकेवाडी या मानाच्या गणपतीची आरती नगराध्यक्षा निर्मला आवारे आणि नायब तहसीलदार तडवी यांचे हस्ते करण्यात आले. तसेच मंडळाच्या अध्यक्षांचा स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावर्षी न्यायालयाने डीजे डॉल्बीला बंदी केल्याने सर्वच गणेश मंडळांनी ढोल-ताशा आणि लेझीमच्या खेळांवर विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात पथके दंग होऊन नाचत होती तर शेकडो गणेश भक्तांनी मिरवणुकित सहभागी होऊन गणरायाला बाप्पा मोरयाच्या गजरात निरोप दिला. मंगळवार पेठ मार्गे राजवाडा चौकापर्यंत निघालेल्या या मिरवणुका रात्री 12 वाजेपर्यंत सुरु होत्या. यावेळी राजवाडा चौकात पुन्हा गणपतींची आरती होऊन नीरानदी घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मंगळवार पेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव आणि सुभाष तरुण मंडळाच्या मिरवणुका सायंकाळी 5 वाजता पार पडल्या. दहा दिवसांचे घरगुती गणेशांचेही विसर्जन करण्यासाठी नीरानदी घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भोर शहरातील शेटेवाडी चौपाटी येथील जवाहर तरुण मंडाळाने यावर्षी गुलालाची उधळण टाळुन फुलांचा वर्षाव करत काढलेली मिरवणूक सर्व गणेश भक्तांचे लक्ष आकर्षित करणारी होती. भोर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुमंत शेटे यांनी हा निर्णय घेतल्याने प्रदूषणमुक्त मिरवणूक पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ठरली. कुंभार टेकडी गणेशोत्सव मंडळाने मोहरम आणि गणेशोत्सव सण एकत्र साजरा करण्याची 116 वर्षांची परंपरा कायम राखत एकाच ठिकाणी ताबुत आणि गणेशाची प्रतिष्ठापना करुन एकतेचा मंत्र दिला. यावर्षी मिरवणुका डीजमुक्त करून पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आल्याने शहरातील सर्व गणेश मंडळांचे भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक पांडुरंग सुतार यांनी मंडळांना धन्यवाद दिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)