भोरमध्ये कॉंग्रेसच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

भोर- भोर तालुका कॉंग्रेस पक्षाने आज (दि. 10) सकाळी 11 वाजता शेटेवाडी (चौपाटी) येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते पुष्पहार घालून शेटेवाडी, भोर नगर पालिका चौक ते मंगळवार पेठमार्गे राजवाडा चौकापर्यंत केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरुद्ध निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला. आमदार संग्राम थोपटे यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्च्यात तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शेलेश सोनवणे, जिल्हा कॉंग्रेसचे दिलीप बाठे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गीतांजली शेटे, भोर शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा भेलके, सुवर्णा मळेकर, नंदा जाधव, सहभागी झाले होते.
यावेळी राजवाडा चौकात आमदार संग्राम थोपटे यांनी भाजप सरकारच्या सततच्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाला जगणे आवघड होऊन बसले असून, या दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्रातील नागरिकांना बसत असाल्याने भाजप सरकारबाबत सामान्य जनतेत असंतोष पसरला असल्याचे सांगून या सरकारचा निषेध केला.
यानंतर भोरचे तहषीलदार पाटील यांना सरकारचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले.

  • राष्ट्रवादीने बंदकडे फिरवली पाठ
    राष्ट्रीय कॉंग्रेसने पुकारलेल्या या भारत बंद संपात राष्ट्रवादी पक्षाचे नेत्यांनी सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला असताना भोर तालुका राष्ट्रवादी पक्षाने मात्र या संपाकडे पाठ फिरवली असल्याने कार्यकर्त्यांत याविषयी उलटसुलट चर्चा होती.
  • गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शटर अर्धे उघडे
    गणेशोत्सव गुरुवार (दि. 13) पासून सुरू होत असल्याने भोरच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून काही व्यापाऱ्यांनी संपाचे समर्थन असतानाही आपली दुकाने अर्धी शटर खाली घेऊन खुली ठेवली होती. दुपारनंतर संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने ग्राहकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)