“भोरमधील गुंडप्रवृतीला लगाम लावणार’

भोर- भोर शहर आणि परिसरातील महिला व शालेय, महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया/ दामिनी पथकांच्या माध्यमातून महिला व मुलींच्या सुरक्षेवर विशेष मोहिम हाती घेणार आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयात प्रबोधन करण्यात येणार असून गुंडगिरी प्रवृत्तीला लगाम लावणार असल्याचे भोरचे नुकताच पदभार स्वीकारले उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.भोर शहर व परिसरातील अवैध दारु धंदे, मटका, जुगार या सारखे धंदे पूर्णपणे बंद करण्यात येतील. तर भोर शहरातील वाहतुकीचा ऐरणीवर असलेला प्रश्‍न भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याशी चर्चा करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या योग्य त्याउपाय योजना करणार आसल्याचे ही यावेळी आण्णासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी मनमोकळी चर्चा करुन तालुक्‍यातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)