भोरच्या स्वागत कमानीला शिवरायांचे नाव देण्यासाठी लाक्षणिक उपोषण

भोर – भोर शहराच्या प्रवेशद्वारावर भोर नगरपालिकेने उभारलेल्या स्वागत कमानीला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी (दि. 24) शहारातील शिवप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्वागत कमानीजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात सचिन देशमुख, सुहित जाधव, दीपाली शेटे, केदार देशपांडे, कुणाल शेटे, किरण पवार, राजेश महांगरे, सिद्धार्थ टापरे, कुणाल धुमाळ, राजेंद्र थोपटे, ओंकार बहिरट, अमित कोठावळे, शाम गोळे, विजय सुरगुडे, समीर घोडेकर, अमर बुदगुडे, सुशिल तारू, योगेश गुठाळकर, मानसिंग धुमाळ तसेच अनेक गांवच्या सरपंच आणि शिवप्रेमी तरुणांचा सहभाग होता. या विषयाच्या अनुषंगाने भोर तालुका व शहर शिवसेना, तसेच इतर शिवप्रेमी संघटनांनी आंदोलने करून भोर नगर पालिका प्रशासनास लेखी निवेदने देऊनही प्रशासन या विषयाकडे लक्ष देत नसल्याने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)