भोरच्या संस्थाचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

जोगवडी- एका दलित मुकबधीर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना जातिवाचक अपशब्द वापरणे व दमदाटी केल्याप्रकरणी भोर एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष व एका शिपायांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक (ऍस्ट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जामीनासाठी दाखल केलेला अर्ज कोर्टाने जामीन फेटाळला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती खंडाळा पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाधव कुटुंबीय खंडाळा तालुक्‍यात मोर्वे या गावी राहत असून त्यांची दहा वर्षांची मुलगी भोर शहरामध्ये मुकबधीर शाळेमध्ये शिकण्यासाठी व राहण्यासाठी होती. 28 सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास शाळेमधील सीताराम नलावडे (रा. भोर) हे संबधित विद्यार्थिनीला घेऊन तिच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या जिवाला घोर लावून तुम्ही इकडे निवांत झोपलाय यापुढे तुमच्या मुलीला वसतिगृहात ठेवणार नाही असे सांगून जातिवाचक शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे भोर एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विजय अमृत रावळ यांनी ही फोनवरून दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीच्या आईने खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला असता कोर्टाने तो फेटाळून लावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)