भोरच्या श्री वाघजाई मंदिरात भाविकांची गर्दी

भोर- भोर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री वाघजाई देवी मंदिरात पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत देवीस विधिवत महाभिषेक, होमहवन करून देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ भेलके पाटील यांच्या हस्ते घटस्थापना व महाआरती करुन शारदिय नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा माजी नगर सेवक यशवंत डाळ, लक्ष्मण राऊत, सचिव सुरेशचंद्र गुजराथी, बलदेव बांदल, गणेश बांदल उपस्थित होते.
भोर दऱ्याच्या डोंगरावर असलेल्या श्री वाघजाई मंदिर, श्री जानाई माता मंदिर, श्री नवलाई माता मंदिर येथेही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
श्री वाघजाई देवीचे मंदीर पूर्वी भोरदऱ्यातील डोंगरावर होते. श्री वाघजाई देवी मंदीर परिसरात चोवीस तास वाहणारा झरा असून संस्थान काळात तेथे चिरेबंदी दगडात जलकुंड बांधण्यात आले आहेत. श्री वाघजाई देवी मंदिरास शासनाने देवस्थानचा दर्जा दिला असून कोट्यवधींचा खर्च करुन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यशवंत डाळ यांच्या पुढाकाराने विश्वस्त मंडळाने देवीचे मंदिर, आणि परिसर सुशोभित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)