भोरच्या पुलाला वृक्ष लागवडीचा भास

जोगवडी- भोर शहराच्या उत्तर बाजूस असणारा शहराला जोडणारा पूल ब्रिटिश कालीन असून, दगड बांधकामांमध्ये तयार केला आहे. या पुलाला राणी लक्ष्मीबाई ब्रिज असे नाव देण्यात आलेले आहे. नीरा नदीवरील असणाऱ्या या पुलाच्या खांबांवर झाडेझुडपे उगवली असून, पूल कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे. या पुलाची निगा न राखल्याने दगडी खांबावर वृक्ष लागवड केली आहे की काय, अशी संतापजनक चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत. याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत .
या पुलावरून दररोज अवजड वाहने, व्यावसायिक चारचाकी व दुचाकी अशा विविध प्रकारच्या वाहनांची ये-जा होत असते. भोर शहर, शिरवळ, महाड आणि वाई या ठिकाणी जात असताना या पुलाचा वापर होतं आहे. यात पर्यटकांच्या वाहनांची भर पडत आहे. भोरमधील राजवाडा, नीरा देवघर धरण, अंबवडे येथील झुलता पुल, रायरेश्वर पठार येथे पर्यटक आकर्षित होत असल्याने वाहनांची संख्या वाढत आहे. पुलाच्या दगडी बांधकामावरील झाडे उगवल्याने याची मुळे बांधकामात रुजल्याने बांधकामाचा पुलाचा भक्कमपणा कमी होत आहे. यावर उपायोजना म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन झाडेझुडपे तोडावीत, पुलाची निगा राखावी, अशी मागणीची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत .

  • भोर तालुक्‍याला ऐतिहासिक वैभव लाभले असून, पूर्वीच्या काळी भोर शहराची संस्थान म्हणून ख्याती होती. भोर संस्थानचे अधिपती श्रीमंत रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब पंडित पंतसचिव यांच्या कारकिर्दीत या पुलाचे काम झाले. श्रीमंत रघुनाथराव यांच्या द्वितीय पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई राणीसाहेब यांच्या स्मरणार्थ या पुलाला राणी लक्ष्मीबाई पूल असे नाव देण्यात आले. पुलाचे उद्‌घाटन 20 जून 1933 रोजी झाले. या पुलाचा प्लॅन इंजिनियर विष्णू कान्हेरे यांनी तयार केला असून ठेकेदार व्ही. आर. रानडे यांनी पूर्ण केले. पुलाच्या कामाची सुरुवात 20 फेब्रुवारी 1931 रोजी झाली असून 17 मे 1933 रोजी पूर्ण बांधकाम दगडात करण्यात आले. पूल बांधण्यासाठी त्यावेळी एकंदरीत देड लाख खर्च आला.
    भोर शहराकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होत असून, भोर शहरातून बाहेर पडण्यासाठी नवीन पर्यायी पुलाचा वापर केला जातो. हा पुल ब्रिटिशकालीन असून दगड बांधकामाचा आहे
  • या पुलावरील झाडे काढण्यात आली असून, पुलाचे अमेट्‌मेण्ट व खांबांवरील झाडे काढण्यासाठी क्रेनची आवश्‍यकता असून, क्रेन उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ ही झाडे तोडण्यात येतील.
    -आर. एल. ठाणगे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)