भोरच्या गणेशोत्सवात रोषणाई आणि जिवंत देखाव्यांवर भर

भोर- भोर शहरात एकूण 52 गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून, या सर्वच मंडळांनी प्रामुख्याने रोषणाईवर भर दिलेला दिसून येत आहे. शेटेवाडी चौपाटी येथील जवाहर तरूण मंडळाने “वेडात मराठी वीर दौडले सात’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंगळवार पेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बोलत्या बाहुल्यांचा देखावा सादर करून गणेश भक्तांना खिळवून ठेवले आहे. एसटी स्टॅण्डजवळील साई सुदर्शन मंडळाने लक्षवेधी गणेशाचा देखावा सादर केला आहे. राजवाडा चौकातील कमानीजवळील अमर तरुण मंडळाने विद्युत रोषणाई सादर केली असून 63 वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाचे अध्यक्ष अजिंक्‍य गुजर आहेत. नवरत्न मित्र मंडळाने जिवंत देखावा सादर केला आहे, तर मंगळवार पेठेतीलच गोल्डन तरुण मंडळाने शिवरायांचे 32 मणांचे सिंहासन हा देखावा सादर केला आहे. येथील शिवाजी ररणि मंडळाने भव्य गणेश मूर्तीची स्थापना केली आहे, तर नवयुग तरुण मंडळाने फिरती विद्युत रोषणाई केली आहे. सम्राट चौकातील सम्राट तरुण मंडळाने चिनी वस्तूंच्या होळीचा स्लाईड शो देखावा सादर केला आहे. कुंभार टेकडी, भोई आळी येथील भोईराज तरुण मंडळ, भेलकेवाडीतील जय हनुमान तरुण मंडळांनी आकर्षक सजावट केली आहे. आमराई आळीतील अचानक तरुण मंडळाने भारत-चीन युद्धाचा देखावा सादर केला आहे, तर चौपाटी वाघजाई नगर येथील सिद्धी विनायक या कातकरी मित्र मंडळाने विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला असून, गणेशोत्सव काळात धूम्रपान आणि मच्छिमारी न करण्याचा आभुतपूर्व निर्णय घेतला असून समाज प्रबोधन केले आहे. या शिवाय भोर शहरातील विद्यानगर, माळ्याचा मळा, गणेश पेठ, संजय नगर, रामबाग, आदी ठिकाणी विविध प्रकारचे देखावे सादर करून गणेशोत्सवाची रंगत वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)