भोरचा कुस्ती आखाडा पाच तास रंगला

भोर- भोर शहराचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रा उत्सव आणि श्रीराम नवमी निमित्त भोर शहर यात्रा कमिटीने सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कुस्तीत पै. बालार रफिक शेख याने प्रतीस्पर्धी पै. गणेश जगताप याला आवघ्या पंधरा मिनीटांत चितपट करीत श्री जानाईदेवी किताबासह बुलेट पटकविली. या आखाड्यात 50 रुपयांपासून एक लाख 51 हजार रुपयांपर्यंत इनाम पैलवानांना देण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे आणि जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे यांच्या प्रमुख उपस्थित कुस्त्यांचा आखाडा सायंकाळी 5:00 वाजता सुरू झाला तो रात्री 10:15 वाजेपर्यंत सुरु होता. या कुस्त्यांच्या आखाड्यास भोरसह वेल्हा, मुळशी, पुरंदर, तालुक्‍यासह पुणे, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, सांगली जिल्ह्यातील सुमारे 300 पेक्षा आधिक मल्लांनी हजेरी लावली होती. शेवटची निकाली आणि अटीतटीची कुस्ती पै. बालार शेख आणि पै.गणेश जगताप यांच्यात झाली. यात माणाचा श्री जानाई देवी किताब आणि बुलेट आमदार पुत्र पृथ्वीराज थोपटे यांच्या हस्ते देऊन पै. बालार शेख यांचा गौरव करण्यात आला. तर उपविजेता पै. गणेश जगताप याला एक लाख 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस जि.प.सदस्य रणजीत शिवतरे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे, भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, सदस्य श्रीधर किंद्रे, नगराध्यक्ष तानाजी तारु, उपनगराध्यक्ष उमेश देशमुख, माजी नगराध्यक्ष सचिन हर्नसकर, पै. रामचंद्र आवारे, यात्रा कमिटी अध्यक्ष व नगरसेवक यशवंत डाळ, उपाध्यक्ष गणेश पवार, गजानन शेटे यांच्यासह भोर शहर व तालुक्‍यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यात्रा कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक यशवंत डाळ व उपाध्यक्ष गणेश पवार व संचालकांनी या कुस्त्यांचे आखाड्याचे नियोजन केले होते. पंच म्हणुन यात्रा कमिटीच्या सर्व संचालकांनी काम पाहिले. आखाड्याचे सुत्रसंचालन राहुल शेटे यांनी केली तर कुस्त्यांचे आखाड्याचे समालोचन ज्योतिराव वांझे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)