भोरगिरीत वाहतेय विकासाची गंगा

वाडा- भोरगिरी आणि परिसरात गेली चार-पाच वर्षात खेड आणि शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्या विचारात घेऊन आमदार सुरेश गोरे यांनी भोरगिरीच्या विकासाचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने वनविभाग, अभयारण्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांची मदत घेऊन सध्या विकासकामे जोरदार सुरू आहेत.
रास्ता, रेलिंग, प्यागोडा, मंदिर सभामंडप, स्मशानभूमी, गावठाण रस्त्याची पाहणी, नदीघाटाची पाहणी, नंदी स्थापनेचे ठिकाण, जुन्या घोटीव दगडी वस्तू आणि शिल्पांची पाहणी या सर्व कामांमध्ये आमदार सुरेश गोरे यांनी लक्ष घातले आहे. ज्या दिवशी त्यांना भोरगिरी आणि परिसरात जायचे असेल त्या दिवशी वनखाते, अभयारण्य विभाग यांच्या सर्व अधिकारी आणि ग्रामस्थांसोबत ते या भागात पायी दौरा करतात. ग्रामस्थांचे कामाबाबततचे मत त्यावर अधिकाऱ्यांचे आराखडे यात सुसंवाद कसा होईल आणि सर्व कामे लोकसहभागातून कशी जातील याचा ते प्रयत्न करतात.
सध्या भोरगिरी परिसरामध्ये प्यागोडा, भोरगिरी मंदिरालगतच्या नदीघाटाची आणि मंदिराच्या संभामंडपाची कामे सुरू असून तीन प्यागोडा उभारण्यात आले आहेत. प्यागोडा ज्या जागेवर उभारण्यात आले आहेत, त्या भागात जंगल भ्रमंती करणाऱ्यांना त्या ठिकाणावरून आजूबाजूच्या वनस्पती, जंगल आणि जंगली प्राणी यांचे निरीक्षण करण्यासाठी सोया उपलब्ध् झाली आहे. या कामांच्या दर्जाबाबत येथील ग्रामस्थांचे लक्ष असल्याने काही प्रश्‍न निर्माण झाला की ग्रामस्थ प्रत्यक्ष आमदारांना संपर्क साधत असतात. आमदार गोरे यांच्या या प्रयत्नामुळे या भागात जी कामे झाली आहेत, त्यामुळे या भागात पर्यटकांचे प्रमाण वाढू लागले आहे.
भोरगडावर जी पाण्यासाठी तळी आहेत ती साफ करावी अशी पर्यटक आणि येथील ग्रामस्थ मागणी करत आहेत. या मागणीचाही भावी काळात विचार करून भोरगडाचे सौंदर्य कसे वाढेल यासाठी आमदार प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)