भोपाळमधील अपघातात नाशिकचा जवान शहीद

नाशिक : आर्मीच्या भोपाळ युनिटमधील कार्यरत नाशिकच्या जवानाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. प्रथमेश दिलीप कदम असे शहीद जवानाचे नाव आहे.

मूळचा रायगड जिल्ह्यातील मात्र नाशिकच्या श्रमिकनगरमधील प्रथमेश कदम हा भोपाळमधील आर्मीच्या ३ ईएमई युनिटमध्ये कर्तव्यावर होता. भोपाळमध्ये शुक्रवारी ओव्हरहेड वायरला लागून एका ट्रकचा अपघात झाला. या अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रथमेश व त्याच्या सहकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. या ठिकाणी काम करताना झालेल्या अपघातात प्रथमेश सुमारे ९० टक्के भाजला. त्यास तातडीने उपचारासाठी दिल्ली येथे हलविण्यात आले होते. दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी प्रथमेशचा मृत्यू झाला.

शहीद प्रथमेशच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहिणी असा परिवार आहे़ दरम्यान गुरुवारी प्रथमेशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार असून तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)