भोजलिंगच्या दरीत जीप कोसळून भिषण अपघात

भाविकातील तिघीजणी जागीच ठार तर तेराजणी जखमी

म्हसवड दि 22 प्रतिनिधी – माण तालुक्‍यातील डोंगरमाथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानाकडे दर्शनासाठी आलेल्या विटलापुर ता. आटपाडी येथील भाविकांच्या जीपला शनिवारी अपघात झाला. जांभुळकणीकडील डोंगर उतारावर चालकाचा ताबा सुटून जीप दरीत कोसळली. या दुर्घटनेत तीनजण मृत्युमुखी पडले तर तेराजण गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेने अवैध प्रवासी वाहतूक व भोजलिंग डोंगरावरील सरंक्षण कठड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीकच्या डोंगरमाथ्यावर श्री भोजलिंग देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी विटलापुर येथिल महिला भाविक जीपमधून आल्या होत्या. मंदिराकडे जाण्यासाठी जांभुळणी आणि वळई गावाकडून असे दोन मार्ग आहेत. त्यापैकी जांभुळणीकडील डोंगर उतारावरील चालकाचा ताबा सुटला आणि जीप किमान दोनशे फूट दरीत कोसळली. या जीपमध्ये चालकासह 16 प्रवास होते . त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.तर 13 जण गंभीर जखमी झाले. चालक दगडू खंडू यादव याने गाडीतून उडी टाकली आणि जीव वाचवला.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात ऐवढा गंभीर होता की घटना स्थळावरील दृश्‍य हे काळीज पिटाळून टाकणारे होते. विषेश म्हणजे गाडीत सर्व महिला प्रवासी होत्या.

भोजलिंग हे डोंगरमाथ्यावर प्रसिध्द देवस्थान आहे. हा डोंगर खडा आहे. या डोंगरावर जाण्यासाठी जांभुळणी आणि वळई कडून जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. जांभुळणी कडून जाण्यासाठी पायरी मार्ग आहे तर वळई, काळचौंडी कडून जाण्यासाठी वाहन रस्ता आहे. मात्र या डोंगरावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात मोठे चढ-उतार आहेत. या रस्त्याच्या कडेला सरंक्षण कठडा नसल्याने या मार्गाने मंदिराकडे डोंगरावर जाण्यासाठी वाहनधारकांना जिव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत विठलापुर येथील महिला आज पौर्णिमे निमित्त महिंद्रा कंमाडर या गाडीने भोजलिंगाचे दर्शनासाठी आल्या होत्या. ही गाडी डोंगर माथ्यावर चढत असताना खड्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून जीप दरीत कोसळली.

या अपघातातील मयताची नावे पुढील प्रमाणे..
सिंधू धोंडिबा गळवे ( गळवेवाडी ) , मनिषा बाळू आटपाडकर ( गांव विठलापूर ) , कंठाबाई कैलास आटपाडकर( विठलापूर ). या तिघींचा जागीच मृत्यू झाला.

अपघातील जखमींची नावे पुढील प्रमाणे..
इुंदुताई दुर्योधन बाड(47), कमल नाथा बाड (50), पुष्पा दत्तात्रय बाड (32), कामिना संदिपान बाड (52), सुरेखा शंकर बाड (45), इंदू लक्ष्मण बाड (45), अंजना सुधाकर काळेल (50),
छाया नाथा बाड (50), संगिता आटपाडकर (55), सखुबाई भीमराव काळेल (60) ,आशाताई छगन काळेल , प्रज्ञा प्रभाकर बाड (25), वंदना नंदकुमार काळेल (45) . जखमींवर म्हसवड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)