भोजपुरी गायक पवन सिंहच्या कार्यक्रमावर दगडफेक

भोजपुरी सिनेमातील स्टार गायक पवन सिंहचे व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत असतात. भोजपुरी गाण्याचा कार्यक्रम तो देशभर करत असतो. मात्र अलिकडे त्याच्या या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधून दगडफेक होण्याच्या घटना घडायला लागल्या आहेत. बिहारमध्ये अलिकडेच अशाच एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधून दगडफेक व्हायला लागली. त्यावेळी स्टेजवरून निघून जाण्याऐवजी पवन सिंहने प्रेक्षकांना हात जोडून भावनिक आवाहन केले. तुमच्या या दगडफेकीमुळे मला काही इजा झाली तरी हरकत नाही. पण कार्यक्रम बंद पडला तर कित्येकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल.

तुम्हाला जर मी स्टेजवर आल्याचे चालणार नसेल, तर मी यापुढे कधीच स्टेजवर येणार नाही. असे त्याने म्हटले. त्याच्या या भावनिक आवाहनाला साद देत प्रेक्षकांनीही शांतता बाळगली. यापूर्वी बिहारच्या बज्क्‍सर जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमाच्यावेळीही अशाच प्रकारे दगडफेक सुरू झाली होती. तेंव्हा पवन सिंह अगदी थोडक्‍यात बचावला होता. मात्र त्याच्या कारच्या खिडक्‍या मात्र फुटल्या. त्याच दरम्यान खेसारीलाल यादववरही असाच प्राणघातक हल्ला झाला होता. पवन सिंह आणि आम्रपाली दुबेचा “शेर सिंह’ हा बिगबजेट सिनेमा आता तयार होत आला आहे. त्याच्या क्‍लायमॅक्‍सचे शुटिंग बॅंकॉकमध्ये झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)