भोगवटा जमिनी परिवर्तित करण्याचा कायदा राज्यभर लागू करा

आ. जयकुमार गोरे : विदर्भाला झुकते माप अन्‌ उर्वरीत महाराष्ट्रावर अन्याय करु नका
खटाव, दि. 11 (प्रतिनिधी) –
भोगवटा वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 गटात परिवर्तित करताना विदर्भावर मेहरबानी आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय करु नका. सदर कायदा लागू करताना विनाकारण गडबड गडबड न करता संपूर्ण राज्यासाठीच हा कायदा लागू करावा, असे मत आ. जयकुमार गोरे यांनी मांडले.
नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ सभागृहात तातडीच्या व महत्वाच्या बाबींकडे शासनाचे लक्ष वेधताना ते बोलत होते. आ. गोरे याविषयी बोलताना पुढे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी भोगवटा वर्ग एकच्या जमिनी आहेत. अनेक जमिनी कित्येक वर्षांपासून संस्थानिकांच्या नावावर आहेत. अशा जमिनी कसणाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. सरकार या जमिनी वर्ग दोनमधे परिवर्तित करण्याचा कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे. हा कायदा करताना फक्त विदर्भाचाच विचार केला जात आहे. आमच्या पश्‍चिम महाराष्ट्रात तर गावेच्या गावेच संस्थानिकांच्या नावे आहेत. या जमिनींबाबतही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.
माण तालुक्‍यातील म्हसवडला 200 वर्षांपूर्वी संस्थानिक होते. गेल्या 100 वर्षांपासून त्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना कसायला दिल्या गेल्या आहेत. मात्र, आजही त्या जमिनी संस्थानिकांच्या नावावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा जमिनींवर कर्ज घेता येत नाही, बांधकाम करता येत नाही की कोणत्याच परवानग्या घेता येत नाहीत.
या कायद्यासंदर्भात शासनाने योग्य निर्णय घ्यावा. सदर कायदा विदर्भापुरता न करता संपूर्ण राज्यासाठी करावा. हे अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. अद्याप वेळ गेलेली नाही. संपूर्ण राज्याचा विचार होणे गरजेचे आहे. घाईघाईने निर्णय घेण्यात आला तर उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होणार आहे.

तरीही पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय
हे सरकार फक्त विदर्भाचे आहे अशी लोकांची पक्की धारणा झाली आहे. अनेक सोयी, सुविधा आणि लागेल तितका निधी विदर्भाला दिला जात आहे. उर्वरित आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर मात्र सतत अन्याय केला जात आहे. शेतीपंपाचा एकही वीजजोड आमच्या शेतकऱ्यांना दिला जात नाही. चंद्रकांत पाटलांसारखे सरकारमधील सर्वात पॉवरफुल मंत्री असूनही आमच्या भागावर अन्याय होत असेल तर सगळेच अवघड आहे, असेही आ. गोरे यांनी विधीमंडळ सभागृहात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)