भोकर शिवारात दोन एकर ऊस खाक

श्रीरामपूर – तालुक्‍यातील भोकर शिवारातील वडजाई परिसरात दोन शेतकऱ्यांच्या तोडणीला आलेला दोन एकर ऊस शॉर्टसर्किट होवून आग लागल्याने जळाला. अग्नीशामक वेळत आल्याने अर्धा एकर उसासह लगतचे गव्हाचे क्षेत्र बचावले.

भोकर व खोकर शिवारात गेल्या वर्षीच्या तुलनेत शॉर्टसर्किटने आग लाण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत अनेक घटना घडल्या, शेतकऱ्यांकडून विज वाहक तारा ओढण्यासाठी अनेकदा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. भोकर – कारेगाव रस्तयालगत शेती असलेले दत्तात्रय दगडू वडघुले गट नं.89 व धनंजय दत्तात्रय वडघुले गट नं.90 मध्ये दोघांचा मिळून अडीच एकर तोडणीला होता. रविवारी (दि.25) सांयकाळी साडेपाच वाजेच्या विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागली. हा प्रकार लगतच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने अनेकांनी धाव घेवून ऊस विझविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी अशोक कारखाण्याच्या अग्नीशमन बंब पाचारण केले; पण तोपर्यंत बराच ऊस जळाला होता.

या पसिरातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे व अग्नीशामक वेळेत आल्याने वडघुले यांचा अर्धा एकर ऊस बचावला त्याचबरोबर लगतचा काढणीला आलेले गव्हाचे क्षेत्रही बचावले. या आगीत वडघुले यांच्या ऊसाच्या शेतातील पीव्हीसी पाईपसह पाईप नेपल, ठिबक संच, व्हाल्व, कॉक हे जळाले त्याच बरोबर संबमर्सीबल विजपंपाची केबल जळाल्याने विजेचा पंप बोअरमध्ये गेल्याने या शेतकऱ्यांचे जळालेल्या उसासह इतरही मोठे नुकसान झाले.
भोकर सोसायटीचे उपाध्यक्ष कचरू पटारे, संचालक सागर शिंदे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तागड, विजय तागड, राजेंद्र वाकडे, विजय वाकडे, नामदेव चव्हाण, सोपान कोल्हे, नामदेव पटारे, पोपट पटारे, दिनकर चव्हाण, कैलास चव्हाण, विष्णू चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, सोमनाथ चव्हाण, आबासाहेब बेरड, सुनील फासाटे, रोहीत अमोलीक आदिंसह मोठ्या संख्येने शेतऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)