भोकर चारीमध्ये तरुणाचा मृतदेह

वडाळा महादेव परिसरातील प्रकार : ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर – तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून कालव्यात फेकलेला मृतदेह आज वडाळा महादेव परिसरात भोकर चारीमध्ये आढळून आला. शहर पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास हरेगाव रस्त्यावरील एस कॉर्नरच्या पुढे वडाळा महादेवहद्दीत भोकर चारीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. बुटका, काळासावळा, बसके नाक असलेल्या या तरुणाचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला असून जीन्स पॅन्ट व टी शर्ट परिधान केलेला आहे. त्याच्याजवळ गांजा, चिलीम, निरोधचे पाकीट आढळून आले. हातावर आयएव्हीएक्‍स अशी अक्षरे गोंदलेली आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिरसगाव, हरेगावसह श्रीरामपूर परिसरातील काही लोकवस्त्यांमध्ये जावून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तथापि, रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)