भोई समाजाचे घंटानाद आंदोलन

अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्याची मागणी

सातारा – भोई समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र भोई समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. केंद्र सरकारच्या इदाते आयोगाच्या शिफारशी लागू करा व भटके विमुक्तांना संरक्षण द्या, क्रिमिलिअरची अट रद्द करा, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमार संस्थांच्या धरणाची ठेक्‍याची रक्कम माफ करा, जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाच्या तलाव ठेक्‍याची रक्कम पूर्ववत तीनशे रूपये इतकी करा, मत्स्य पालनाकरिता आवश्‍यक असलेली धरणाची पातळी दोन मीटरपर्यंत निश्‍चित करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुटपाथवर चणे-फुटाणे विकणाऱ्या समाज बांधवांना गटई कामगारांप्रमाणे स्टॉल्स द्या, शासन परिपत्रकानुसार पांरपारिक पध्दतीने नदीपात्रातून गौण खनिजाची विना रॉयल्टी वाहतूक करण्यास परवानगी द्या, नागपूर मेट्रो रेल्वे स्टेशन तसेच महाराष्ट्र मत्स्यद्योग विकास महामंडळाला स्व.खासदार जतिराम बर्वे यांचे नाव द्या, एस.सी व एस.टीच्या धर्तीवर भटके विमुक्तांना वसतिगृह सुरू करा, कोकणसह राज्यातील पाणी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करून मच्छीमारांना संरक्षण द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटके विमुक्त वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण द्या, अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)