कराड -भोंदूबाबाकडून फसवणूक झालेल्या लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच लोकांची फसवणूक करण्यासाठी भोंदूबाबाला सहकार्य करणाऱ्यांचा शोध घेत असून त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ओंड (ता. कराड) येथे तालुका पोलिसांनी सातारा एलसीबी व अनिसच्या मदतीने रविवारी सकाळी कारवाई करून भोंदू बुवाला गजाआड केले होते. अंगठ्या व रोख रक्कम तसेच लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले होते. शंकर भीमराव परदेशी (वय 55, रा. ओंड, ता. कराड, मूळ रा. कर्नाटक) असे भोंदू बुवाचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुनील विश्वास काळे यांनी कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचण दूर होण्यासाठी भोंदू बाबा शंकर परदेशीकडे गाऱ्हाणे मांडले. त्यावर सुनील काळे यांच्याकडे दहा हजारांची मागणी केली. पैसे देऊनही फायदा होत नसल्याने काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे (अनिस) लेखी अर्ज देऊन तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)