भैरवनाथ विद्यालयात हिंदी दिन साजरा

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयात हिंदी दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन साजरा करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता, संभाषण, हिंदी चुटकले सादर केले. सर्वप्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डी. डी. जाधव, शरद शिंदे, कल्याण टेमकर यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रके तयार केली. तसेच हिंदी दोहे, प्रार्थना, हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणे दिली. यामध्ये इयत्ता 10वीच्या अपूर्वा नाणेकर, पल्लवी आगरकर, रेखा भोर, श्‍वेता इंदोरे या विद्यार्थिनींनी दोहे व कथा सादर केल्या. इयत्ता 5वी व 6वी च्या विद्यार्थ्यांनी मजेदार कविता, संभाषण, हिंदी चुटकले सादर केले. यावेळी अध्यापिका ए. पी. गाडे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.सूत्रसंचालन एच. आर. जमादार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)