भैरवनाथ विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन

चिंबळी- कुरुळी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना ताण तणावाचे व्यवस्थापन , परीक्षेची पूर्वतयारी , वेळेचे नियोजन आणि करियर गाईडन्स या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व बजाज ऑटो यांच्या संयुक्‍त विद्यमाने मुलांच्या सर्वांगीण जीवनकौशल्य व कार्यकौशल्य विकास या उपक्रमाअंतर्गत वरील विषयांवर धनंजय विचारे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावाचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. वाय. व्यवहारे, आर. एच. पठाण, मॅजक बस इंडिया फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक प्रवीण थोरात, कुरुळी येथील मॅजिक बसचे प्रतिनिधी रविंद्र शेळके, समुदाय समन्वयक आरती कांबळे आदी उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)