भैरवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

अवसरी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये 533 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, अशी माहिती स्थानिक शाळा समितीचे सदस्य शरद शिंदे यांनी दिली. अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालय व सौ. वनिताताई विठ्ठल अभंग जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात हिंदू हिन्दुस्तान फीड्‌स बारामती, कॅटल फीडस प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर, यांच्या संयुक्‍त विद्यमाने व कंपनी डीलर गोवर्धन पशुखाद्य विक्री केंद्र अवसरी फाटा, पिरसाहेब डेअरी अवसरी खुर्द, भीमाशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था यांच्या सहकार्याने विद्यालयात इयत्ता पाचवी ते नववी अखेर शिकणाऱ्या 533 विद्यार्थ्यांना पाच वह्यांच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुनिता कराळे, उपसरपंच अनिल शिंदे, विद्यालयाचे सल्लागार शरद शिंदे, प्राचार्य सूर्यकांत मेंगडे, कंपनीचे विपणन अधिकारी सिद्धेश्वर कांबळे व विक्री अधिकारी राहुल देशमुख, अरुण जरे, माजी सभापती आनंदराव शिंदे व स्थानिक स्कुल कमिटी सदस्य कल्याण शिंदे ,अशोक रामदास चक्कर, मनोज शिंदे, बाळासाहेब गावडे, उमेश चक्कर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती साबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक डी. एच. चत्तर, व्ही. टी. इंगळे, जे. व्ही. गुरव, डी. एस. शेटे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)