भैरवनाथ विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालय व वनिता विट्टलराव अभंग ज्युनिअर कॉलेज सायन्स विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये विविध वेशभूषा परिधार करून विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक प्रशांत अभंग, शरद शिंदे, कल्याण टेमकर, प्रा. डी. डी. जाधव, सरपंच संगीता कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर प्रतिमेचे पूजन ग्रामस्थांनी केले. पारंपारिक वेशभुषेमध्ये जय मल्हार मालिकेतील साई प्रशांत अभंग याने खंडोबाची वेशभूषा परिधान केली. त्याशिवाय शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत लौकिक शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा विशाल हिंगे, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वेशभुषेमध्ये प्रतिक तांबडे, झाशीची राणीच्या वेशभूषेत तेजल शिंदे, जिजाऊंच्या वेशभुषेत तनुजा टेमकर, लोकमान्य टिळक यांच्या वेशभुषेत तन्मय बेल्हेकर, संत तुकाराम यांच्या वेशभुषेत देवदुत अमले, संत ज्ञानेश्‍वर यांच्या वेशभुषेत अथर्व भोर, ज्योतिबा फुले यांच्या वेशभुषेत रितेश भोर, संत नामदेव यांच्या वेशभुषेत दीपक तांबडे व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा ज्ञानेश्‍वरी शिंदे हिने परिधान केली होती. कार्यक्रमात ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक प्रशांत अभंग यांच्या हस्ते प्रा. डी. डी. जाधव, आदर्श शिक्षिका योगिता शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अवसरी गावातील जिल्हा परिषद 1 व 2 च्या मुख्याध्यापकांचा सत्कार शरद शिंदे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर व जगदीश गुरव यांनी केले. कर्मवीर रथ सजावट व मिरवणुक संयोजन ज्ञानेश्‍वर शेटे, चंद्रकांत शिंदे यांनी केले तर विद्यालयाचे पर्यवेक्षक दादाभाऊ चत्तर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)