भैरवनाथ विद्यालयात एलईडी बल्ब विषयावर कार्यशाळा

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये एलईडी बल्ब तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. तसेच यावेळी “चला जीत यशस्वी होऊ द्या’ या विषयावर प्रा. विजय बोऱ्हाडे यांचे व्याख्यान झाले. विद्यालयाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभागाच्या इलेक्‍ट्रिकल कोर्स इयत्ता 11 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना एलईडी बल्ब तयार करण्याची कार्यशाळा पुणे येथील विषयतज्ञ प्रा. विजय बोऱ्हाडे यांनी घेतली. 7 वॅट, 9 वॅट एलईडी बल्ब तयार करण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले. प्रत्येक विद्यार्थ्यांने दोन बल्ब बनविले. एलईडी बल्ब रो मटेरियल विक्री, दर्जा याबद्दल ट्रेनिंग दिले. विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. कार्यशाळा घेण्याचा उद्देश्‍य व महत्व विभागप्रमुख पांडुरंग गाडेकर यांनी सांगितले. कार्यशाळेचे आयोजन व नियोजन वृषाली शिंदे, चंद्रकांत शिंदे, सागर डगळे, के. एस. गायकवाड यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)