भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्तीत यश

चिंबळी- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरूळी (ता. खेड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात 48 किलो वजनी गटात योगिराज टोपणे, 50 किलो वजनी गटात विशाल काशिद, 65 किलो वजनी गटात करण गायकवाड, 71 किलो वजनी गटात दर्शन कांबळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकवाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच चंद्रकांत बधाले, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)