भैरवनाथ विद्यालयाचे बांधकाम दोन वर्षांपसून रखडले

डिकसळ- भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयाचे सुरू असलेले बांधकाम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असल्याने इमारत बांधकाम पूर्णत्वास जाण्यास विलंब होत आहे. या विद्यालयाचे बांधकामाला सुरू होवून दोन वर्षे होवून देखील रखडले आहे. जुनी इमारत ही अत्यंत धोकादायक झालिय भिंतींना ठिक-ठिकाणी तडे पडले असल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण आहेत. याबाबत स्थानिक पालक,माजी विद्यार्थीनी एकत्र येत निधी गोळा करून रयत शिक्षण संस्थेकडे पाठपुरावा करून नविन इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळवुन बांधकामाला सुरुवात केली. मात्र, हे काम दोन वर्षांपासून रखडलेच असल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवण गावाचे उपसरपंच जयदीप जाधव, सचिन बोगावत, सुरेश बिबे, हेमंत निंबाळकर,धनाजी थोरात आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)