भैरवनाथ क्रीडा संकुलाचे पारितोषिक वितरण

चिंचवड – येथील भैरवनाथ क्रीडा संकुलाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. 2017-18 या वर्षात अभिषेक देसाई आणि अभय टकले या दोन खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला.

योगासने व रिदमिक जिम्नॅस्टिक व रिदमिक आर्टीस्टिक खेळाची प्रात्यक्षिके सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा व राज्यस्तरिय रोप, मल्लखांब, रिदमिक जिम्नॅस्टिक व रिदमिक आर्टीस्टिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व चषक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संकुलाचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रशिक्षक सई पंडीत, प्रिया महाजन व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)