“भैरवनाथ’चे विद्यार्थी जिल्हास्तरावर

चिंबळी- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिवले (ता. खेड) येथील ज्ञानदिप विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पेर्धेत कुरुळी (ता. खेड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक शिक्षक संदिप सासवडे यांचे सर्व स्तरातून अभिनंद होत आहे.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांची नावे : 14 वर्षाखालील 35 किलो वजन गटांमध्ये धनराज काशिद (प्रथम), 41 किलो : करण माळशिकर (प्रथम), हरीष जोरगुलबार (द्वितीय), 45 किलो : ओम डोंगरे (द्वितीय) 60 किलो : यश बांदल (द्वितीय), ओम गोसावी (तृतीय). 17 वयोगटातील मुलीमध्ये 48 किले : सिद्धि बेंडाले (प्रथम), 52 किलो : अर्पिता डोंगरे (प्रथम), 59 किलो : निकीता पाडेकर (द्वितीय), प्रशाली पात्रे (तृतीय), 70 किलो : किर्ती बर्गे (प्रथम), 75 किलो : वैष्णवी सोनवणे (द्वितीय). मुलांमध्ये 42 किलो : प्रेम मिसाळे (प्रथम), आशिष डोंगरे (तृतीय), 45 किलो : विशाल काशिद (प्रथम), 49 किलो : योगीराज टोणपे (प्रथम), प्रतिक मिसाळे (तृतीय), 63 किलो : करण गायकवाड (प्रथम), अथर्व येळवंडे (तृतीय), 69 किलो : गणेश कांबळे (प्रथम), प्रसाद बनकर (तृतीय), 75 किलो : प्रणव झिजुरके (प्रथम), प्रथम पानसरे (तृतीय), 85 किलो : शिवराज बधाले (द्वितीय), कुणाल आमले (तृतीय) या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्हा स्तरीय स्पर्धेत पात्र ठरले असल्याने व मार्गदर्शन करणारे शिक्षक सदिंप सासवडे यांचे विद्यालयाच्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)