भेसळबाजांना ‘दंडाचा डोस’ 

file photo

गणेश राख 

 पुणे विभागात 12 कोटींचा साठा जप्त 


252 प्रकरण निकाली; 40 लाख रुपयांचा दंड 


 जिल्ह्यातील 24 प्रकरणे न्यायालयात वर्ग 


गेल्या वर्षी 2,773 दुकानांची तपासणी 

पुणे – भेसळयुक्त अन्न आणि औषधींविषयीच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या वर्षभरात लक्षणीय कारवाई केली. यात निकृष्ट अन्न, उघड्यावर पदार्थविक्री शिवाय भेसळबाजांना दंड आकारात “डोस’ देण्यात आला. गेल्या वर्षभरात पुणे विभागातील एकूण 252 प्रकरणे निकाली काढत त्यांच्याकडून 39 लाख 56 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे. यात पुणे शहर तसेच जिल्ह्यातील 64 प्रकरणांचा समावेश आहे.

1,227 जिल्ह्यात नमुन्यांची तपासणी 

अस्वच्छता, खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचा किराणा माल अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येतात. एप्रिल 2017- मार्च 2018 पर्यंत एफडीएने पुणे जिल्हातील 1 हजार 227 नमुन्यांची तपासणी केली. यापैकी 131 कमी दर्जाचे, तर 24 असुरक्षित म्हणजे खाण्यास अयोग्य आढळून आले. यापैकी 125 अर्ज खात्यातीलच न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी यातील 64 प्रकरणे निकाली काढत 14 लाख 64 हजार रुपये दंड वसूल केला. तर 24 असुरक्षित नमुन्यांचे (खाण्यास अयोग्य) खटले जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले.

46 ठिकाणी धाडी 
वार्षिक 12 लाख रुपयांच्या कमी उलाढाल असलेल्यांचे असुरक्षित नमुने तडजोड अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. याअंतर्गत असे 30 अर्ज खात्यांतर्गत तडजोड अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले. यातील 19 निकाली काढत 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यातील 46 ठिकाणी धाडी टाकून 42 लाख 36 हजार 416 रुपयांचा अन्नसाठा जप्त केला.

406 आस्थापनांना सुधारणा नोटीस 
जिल्ह्यातील 406 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठवल्या आहेत. सुधारणा नोटीस पाठवल्यानंतर त्यांना सुधारणा करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी दिला जातो. यामध्ये त्यांनी सुधारणा करणे अपेक्षित असते, अन्यथा त्यांचे परवाने निलंबित केले जातात. नोटीस देऊनदेखील सुधारणा न करणाऱ्या 51 आस्थापनांचे परवाने गतवर्षी एफडीएने काही कालावधीसाठी निलंबित, तर 28 प्रकरणे न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवले. यातून 4 लाख 28 हजार दंड वसूल केला. या आस्थापनातील 470 प्रकरणे दंडात्मक कारवाई करण्यासाठी दाखल केले. या 321 प्रकरणांतून 16 लाख 17 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला.

अन्नभेसळ करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येते. विक्रेते, उत्पादकांनी भेसळ तसेच इतर प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. असा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी संबंधितांची तक्रार करावी. त्याची दखल घेतली जाईल. 24 तासांत कधीही तक्रार करता येईल.
– संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग 

येथे करा तक्रार 
1800-222-365 
अन्न व औषध प्रशासन टोल फ्री क्रमांक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)