भेसळखोरांना जन्मठेपेची शिक्षा विधानसभेत विधेयक मंजूर 

दूध, खाद्यपदार्थ व औषधात भेसळ करणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा

मुंबई – दूधासह खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या भेसळखोरांना राज्य सरकारने आता चांगलाच दणका दिला आहे. भेसळखोरांविरोधात राज्य सरकारने कडक पाऊले उचलत कठोर कायदा आणला आहे. या कायद्यानुसार दोषी ठरणाऱ्या भेसळखोरांना आता जन्मठेपेची शिक्षा होणार असून तो अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे. या शिक्षेची तरतूद असणाऱ्या विधेयकाला आज विधानसभेत मंजूरी देण्यात आली.

दूध, खाद्यपदार्थ तसेच औषधांमध्ये भेसळ करीत नागरीकांच्या जीवाशी खेळ करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढीला लागले होते. अशा भेसळखोरांना अन्न व औषध प्रशासनाकडून अटकाव करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, यासंबंधीच्या सद्या असलेल्या कायद्यात कडक कारवाईची आणि शिक्षेची तरतूद नसल्याने भेसळखोरांना कारवाईचा व शिक्षेचा धाकच नव्हता.

-Ads-

भेसळखोरांविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला केवळ सहा महिन्याची शिक्षेची तरतूद होती. त्यामुळे भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973, यामध्ये सुधारणा करणारे विधेयक आणले होते. या विधेयकाला विधानसभेत मंजूरी देण्यात आली.
ओडिशा, उत्तर प्रदेश व पश्‍चिम बंगाल या राज्यात भेसळखोरांविरोधात कायद्यात कडक तरतूदी करण्यात आल्या आहेत. या पाश्वभूमिवर राज्य सरकारनेही भेसळ करणाऱ्यांविरोधात जन्मठेपेची शिक्षा आणि अजामिनपात्र गुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)