भेळ_भावनांची… (प्रभात ब्लॉग)

टि..इइई….टि..इइई….टि..इइई करणारा अपंगांसाठी असलेल्या बोगी बाहेरचा एकसारखा आवाज. स्टेशनवर घोळक्याने लोकल ट्रेनच्या आत बाहेर करणारी लोकं. कानाला सवय झालेली गर्दीची बडबड. “टिकिट घर कहा हैं….??”  असे अचानक येउन विचारणारा मुंबईत पहिल्यांदाच आलेला भैया…ह्या पाचशे हजारांच्या गर्दीत मेघनाच्या बोलण्याची वाट बघत उभा असलेला समीर.

मेघना  बाजुला असलेल्या स्टॉल जवळ भेळसाठी आईजवळ हट्ट करणाऱ्या त्या निळ्या फ्रॉकवाल्या मुलीकडे बघत बसलीये…

”मेघना…तु खरचं काही बोलणार नाहीयेस..?”

”बोल, मी ऐकतेय.”

”मला नेमकं हेच नकोय. तु माझ्या सोबत बोल…”

”व्यक्त हो शिव्या घाल… हवंतर मार मला. तुझ्या काहीच न बोलल्याने जिव गुदमरतो माझा.”

”मला नाही रे हे जमणार.
प्रेम वगैरे  असले  काही माझ्या साठी नाहीच…”

”हे  सर्व तु आधीच कस ठरवतेय मेघना .. …? ”

”ह्ह्ह… तेच पुन्हां!! माहित आहे ना तुला माझं. ”

”आई वडील ह्या जन्मात आपल्याला कधीच हो म्हणणार नाहीत…मग उगाच कशाला?”

स्टेशनच्या गर्दीचा आवाज चिरत लोकल ट्रेन त्याच्या नशीबा सारखी तिला पुन्हा त्याच्या पासून दुर घेउन जाण्यासाठी आली होती…
त्याने तिचा हात हातात घेत गाडी निघण्यापूर्वी तिला घट्ट मिठीत घेतले. येणाऱ्या गाडीच्या आवाजा बरोबर ती हळूच त्याच्या कानात पुटपुटली.

‘मी आहे अजुन इथेच…’

तो एका सेकंदात स्टेशनवर असलेल्या-नसलेल्या लोकांमध्ये सर्वात श्रीमंत झाला. त्याच्या अगदी मिठीत असल्यावर पण तिला हे कधीच समजले नसणार कदाचित…!

त्याच्या मिठीतून स्वत:ला सोडवत ती म्हणाली..

”माझ्यावर तु इतके प्रेम करावे असे मझ्यात काहीच नाही समीर.”

”हे ठरवण्याचा नैतिक अधिकार तु गमवला आहेस मेघना..!!
मला सांग तु  इतके गोड का हसतेस ..??”

”म्हणजे…?? ”

”तेच.!!  गोड का हसतेस..??”

”Ummm मूर्ख … काहीही..?”

”अशी अजिबात लाजत नको जाउस…!
आणि हे डोळ्यातले सर्वच भाव काडून टाक.”

”तु वेडा झाला आहेस का..?? ”

”आपण उद्या पासून भेटायचे नाही.
call,message काहीच नाही.”

”चुप.. असे कधीच करू नकोस..!’

”तुझ्या प्रेमात मी वाहवत जाईन.
असे तु पण हसू नकोस, बघू नकोस..लाजू नकोस.”

”कागदात लपेटलेली  ढीगभर भेळ प्रत्येक घासा बरोबर खाली सांडत उगाच भारी  भरणाऱ्या त्या निळ्या फ्रॉक  घातलेल्या मुली कडे बघत ती  पुन्हा हरवली…”

”मेघना…??”

”ह्हम…काय बोलू तुच सांग..?
ठिक आहे तु म्हणतोस तस मी नाही बोलणार काहीच. ”

”तु खरचं काही नाही बोललीस तर तुझे मौन पण मला वेड लावणार..”

”मेघना गालातल्या गालात हसत त्याला
म्हणाली..”

”वेडा आहेस तु…!!!”

”प्रेम करतो ग तुझ्यावर.”

”माहित आहे मला.”

”जवळ आलेली ट्रेन बघीतल्यावर..हिम्मत  एकवटून समीरने
घाबरत घाबरत तिला विचारले..”

”आणि तु …?? ”

पुन्हा तशीच ट्रेन आवाजाला चिरत स्टेशनवर येते…
ती हळूच त्याचा हात हातात घेउन… त्याला जवळ घेत त्याच्या कानात बोलते…

मुद्दाम चुकवलेल्या एका ट्रेननंतर दुसरी ट्रेन येईपर्यंतचा काळ…
पुरेसा आहे ना तुला उत्तर मिळवण्यासाठी..?

आधी ती…नंतर ट्रेन… दोघेही दिसेनासे होतात.

स्टेशनवरचा तो…टि..इइई….टि..इइई
आवाजा सोबत तिचे शेवटचे शब्द कायमसाठी त्याच्या कानात घुमतायेत.

 

– सुमित धिवरे.  
(लेखक हे एल एस रहेजा महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी असून सध्या मुंबई येथे चित्रपट क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतात.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)