मुंबई – राजापूर तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करणे, शिवसेना आमदारांचा निधी तसेच आगामी निवडणुकीत युती आदींबाबत प्रथमिक चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती.

मात्र, ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना वेळ न दिल्याने ही भेट टळली. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्यासोबत आज कोणतीही भेट ठरली नव्हती, असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणार नसेल तर तो प्रकल्प गुजरातला आंदण म्हणून द्यायचा का? असा सवाल करत एक लाख रोजगार देणाऱ्या प्रकल्पाचे गुजरात स्वागतच करेल. प्रकल्पामुळे पर्यावरणाची नेमकी किती हानी होणार हे समजून घेण्याची गरज आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)