भेगडे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स स्पीड आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन

 तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठाण संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय मॅथ्स स्पीड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरणे त्यांना सोडवता यावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेसाठी इयत्ता नर्सरी ते नववी पर्यंतच्या 716 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 87 विद्यार्थ्यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळवले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक मिळाले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. शिक्षिका पायल चेतवानी यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष संदीप चंद्रकांत काकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व सर्व शिक्षकवृंद यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)