भूसंपादन अंतिम टप्प्यात : आळंदी रस्त्यावरील कोंडी फुटणार

सर्वे ऑफ इंडियाची जागा महापालिकेस मिळणार

पुणे – आळंदी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे शेवटच्या टप्प्यातील भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गात सर्वे ऑफ इंडियाची सुमारे 200 मीटर जागा येत असून भूसंपादनासाठीचा संयुक्त पंचनामा मंगळवारी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास बॉम्बे सॅपर्स चौक ते विश्रांतवाडी चौका पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाणार आहे.

-Ads-

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा भूसंपादनाचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनास पाठविण्यात येणार असल्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित असलेल्या 100 फुटी रस्त्याचे काम गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू आहे. संगमवाडी ते शादलबाबा चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अग्रसेन शाळेपर्यंत या रस्त्याचे काम झाले आहे. त्यानंतर पुढे 200 मीटर सर्वे ऑफ इंडियाची जागा असून यानंतर कॉमर झोन आयटी पार्क, टिंगरेनगर आणि नंतर विमानतळ असा हा रस्ता जातो. रस्त्याचे 90 टक्के पूर्ण झालेले असून केवळ 200 मीटरचे काम शिल्लक आहे. त्यामुळे हा रस्ता अर्धवट स्वरूपात वाहतुकीसाठी वापरला जात असून नागरिकांना वळसा घालून त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या वाहतुकीचा ताण आळंदी मुख्य रस्ता तसेच विश्रांतवाडी चौकात येतो. ही बाब लक्षात घेऊन ही जागा तातडीने हस्तांतरित करण्यासाठी पालिकेने तातडीची बाब म्हणून हे भूसंपादन हाती घेतले आहे. या भूसंपादनास सर्वे ऑफ इंडियाने तत्वत: मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे हा रस्ता मार्गी लागल्यास शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)