भूसंपादनासाठी रोख मोबदला मागू नका

कात्रज-कोंढवा रस्ता : महापालिकेची जागा मालकांना विनंती


4 किलोमीटर रुंदीकरण; जागेसाठी 712 कोटींची गरज

पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या अवघ्या 4 किलोमीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या जागेसाठी 712 कोटी रुपयांची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत, त्यामुळे या रस्त्याची गरज लक्षात घेऊन जागा मालकांनी महापालिकेस टीडीआर आणि एफएसआयच्या मोबदल्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी, अशी विनंती अधिकाऱ्यांकडून या रस्त्यातील जागा मालकांना शुक्रवारी केली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी शंत्रुजय मंदीर येथे ही जागा मालकांची बैठक बोलाविली होती. यावेळी महापालिकेकडून या कामाची माहिती नागरिकांना तसेच जागा मालकांना देण्यात आली.

महापालिकेकडून कात्रज चौक ते खडी मशीन चौकापर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 215 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून महापालिकेकडून 3 वेळा या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, या रेडीरेकनरच्या दरानुसार, या भूसंपादनासाठी रोख मोबदला द्यायचा झाल्यास पालिकेस 712 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे हे भूसंपादन एकाचवेळी पालिकेस करणे शक्‍य नाही. परिणामी या रस्त्यासाठी ताब्यात आलेल्या अवघ्या 40 टक्के जागेवरच हे रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे पालिकेकडून जागा मालकांशी चर्चा करून तडजोडीने जागा मिळविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नागरिकांना रोख मोबदला देण्याची स्थिती महापालिकेची नसल्याचे सांगण्यात आले, तसेच जे नागरिक तडजोडीने टीडीआर तसेच जादा एफएसआय देऊन जागा देण्यास तयार असतील त्यांना प्राधान्य देऊन त्यांना मोबदला दिला जाईल, असेही यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट केले. आमदार टिळेकर यांच्यासह पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर आणि भूसंपादन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)