भूसंपादनाचे शिक्के काढा, मगच रिंगरोडसाठी बैठक घ्या

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या निघोजे येथून जाणाऱ्या रिगंरोडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून ते आक्रमक झाले आहेत. सातबारावरील भूसंपादनाचे शिक्के काढा त्यानंतर आमच्या गावात रिगंरोड विषयी बैठक घ्या, अशी भूमिका सर्व ग्रामस्थांनी घेतली आहे. तर प्रशासनाने सहकार्य न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.
पीएमआरडीचे नगररचना विभागाचे सहायक अभियंता ऋतूराज जाधव यांनी शुक्रवारी (दि. 29) निघोजे येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रिंगरोड प्रकल्पबाधित शेतकरी वर्गाची प्राथमिक बैठक घेतली, त्यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी रिंगरोडला विरोध दर्शवित वरील भूमिका मांडली. याप्रसंगी उपसरपंच आशिष येळवंडे, तलाठी स्वाती तावे, ग्रामविकास अधिकारी गाडविलकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ शेतकरी, नागरिक उपस्थित होते. खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रातील निघोजे परिसरात 60 टक्के क्षेत्र एमआयडीसीने संपादित केलेले आहे. त्यापैकी भामाआसखेड धरण पुनर्वसनासाठी वनीकरण शेतीजमिनी आरक्षित असून गावातून विविध प्रकारच्या रस्त्यासाठी भरपूर जमीन गेली आहे. त्यामुळे आता जर रिंगरोड झाल्यास आम्ही भूमिहीन होऊन देशोधडीला लागणार आहे, त्यामुळे आमचा रिंगरोडला विरोध असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पीएमआरडी रिगंरोड प्रकल्पबाधित शेतकरी वर्गांना पीएमआरडीकडून जमिनीच्या बदल्यात 50टक्के जमीन किंवा अन्य विविध प्रकारे मोबदला देण्यात येणार असल्याचे पीएमआरडीचे नगररचना विभागाचे सहायक अभियंता ऋतूराज जाधव यांनी सांगतिले. त्यावर शेतकरी म्हणाले की, आम्ही आमचा विकास करण्यास सक्षम आहोत, गावातून रिगंरोड होऊ देणार नाही रिगंरोडबाबत कोणतेही काम होऊ देणार नाही. पुढील काळात रिंगरोड प्रकल्पबाधित खेड तालुक्‍यातील सर्व गावंच्या वतीने शेतकरी वर्गाची कृती समिती स्थापन करून आंदोलन उभारलेले जाणार असल्याचे मोई, निघोजे गावच्या वतीने माजी आदर्श सरपंच पाटील गवारे यांनी सांगतिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)