भूमि अभिलेख कार्यालय झाले हेलपाटे मारण्याचे केंद्र

नागठाणे, दि. 11 (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या शासकीय कार्यालयापैकी एक असलेले भूमि अभिलेख कार्यालय आहे. सध्या सातारा तालुक्‍यातील याच कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असल्याने हे कार्यालय म्हणजे सामान्य नागरिकांसाठी हेलपाटे केंद्र बनले आहे.
सातारा तालुक्‍यासाठी हे कार्यालय असुन या कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्या मुळे नागरिकांना समस्या भेड़सावत असुन येथील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.केवळ एका अधिकाऱ्यासह दहा कर्मचारी तालुक्‍याच्या कारभार संभाळत आहेत.त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण वाढला आहे.शेकडो प्रकरणे प्रलंबित रहात आहेत.रोज नागरिक येतात,पण अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात.त्यामुळे कारभार हा रामभरोसे असल्याने नागरिकांना वारवांर चकरा माराव्या लागत आहेत तर दुसरीकडे हे कार्यालय एजंटाच्या विळख्यात सापडले आहे.
तालुक्‍यातील गांवांना सेवा देणारे येथील भूमि अभिलेख कार्यालय हे कायम या ना त्याकारणाने चर्चित राहिले आहे. भूमि अभिलेख कार्यालयातूनच शेत जमिनीची मोजणी,जमिनीचे नकाशे,भू संपादन मोजणी,न्यायालयातुन आलेल्या प्ररकणाचे निर्गतीकरण करणे,न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी,खरेदी विक्री,वारस वाटणी नोंदी व त्या बाबतचे दाखले नमूने देण्याचे काम केले जाते.जमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमि अभिलेख कार्यालयाची पायरी चढावी लागते.पण एका कामासाठी लोकांना शेकडो हेलपाटे मारावे लागतात.येथील अधिकारी व कर्मचारी केव्हा येणार हे कोणालाच माहीत नसते तर अनेक कर्मचारी मोजणीच्या नावाखाली कार्यालयात फिरकत नसल्याची चर्चा आहे.
साधी,तातडीची,अति तातडीची असे मोजनीचे प्रकार असुन या अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे या कार्यालयातील पेंडिंग कामात दिवसेंदिवस भरच पडत आहे.त्यामुळ अति तातडीच्या मोजणीला सहा महीने,तातडीची मोजणी सहा ते बारा महीने तर साध्या मोजणीला एक ते दोन वर्ष या पेक्षा जादा कालावधी लागत असल्याने जनता त्रस्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)