भूमिका नसणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

मुंबई: आज देशभरामध्ये काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला मनसेने सक्रिय पाठिंबा दिला. राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने भारत बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसले. दरम्यान भारत बंद आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई येथे एका पत्रकार परिषदेमध्ये ‘शिवसेनेची’ तुलना केसाळ कुत्र्याशी केली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘ज्या पक्षाला स्वतःची भूमिका नाही त्या पक्षाबद्दल काय बोलायचं? कुत्र्याची एक अशी प्रजात असते ज्याचे केस इतके वाढतात की त्याचे तोंड कोणत्या बाजूला आहे हेच समजत नाही’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेची तुलना कुत्र्याशी केली.

‘काँग्रेस सत्तेमध्ये असताना जे भाजपा महागाई विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करायचे, तेच भाजपा आज सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई विरोधात ‘भ्र’ शब्द काढत नाही. आज तुम्ही म्हणता इंधनाच्या दरांवर आमचे नियंत्रण नाही. मग विरोधात असताना आंदोलने का केली?’ असा खोचक प्रश्न देखील त्यांनी विचारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)