भूपीडित शेतकऱ्यांची प्रांताधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा

सुपा येथील औद्योगिकीकरणामध्ये नव्याने होणाऱ्या भूसंपादनासंदर्भात 22 नोव्हेंबर 2018 च्या 21 विषयांवर आज (दि. 26) ला प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार नगरच्या उपविभागीय कार्यालयामध्ये विभागीय अधिकारी गोविंद दानेज व एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पोटेंसह अन्य अधिकाऱ्यांबरोबर आंदोलनकर्ते भूपिडीत शेतकऱ्यांची विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यामध्ये शेतकरी कल्याणकारी संस्थेच्यावतीने विजय ठुबे यांनी बागायती व सुपीक जमिनी देण्याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. तसेच वेळोवेळी दिलेली निवेदने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली नाहीत, असे सांगीतले. त्यावरउपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बागायती व सुपिक जमिनी वगळविण्याचे निवेदने त्वरित वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्‍वासन दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी भूखंडाविषयी प्रश्‍न उपस्थित केला असता उपविभागिय अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले की, भूसंपादनाचे दाखले त्वरित देवून भूखंड अर्ज भरुन देणाऱ्या शेतकऱ्यांना भूखंड देण्याचे आश्‍वासन दिले. त्यावेळी सीएसआर फंडाच्या संदर्भात विचारणा केली असता, प्रत्येक कंपनीला कळवून परिसरातील शेतकऱ्यांसह गावोगावच्या सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करावा असे कंपन्यांना कळविण्याचे आश्‍वासन दिले.

यापुढे संतोष दिवटे व पांडूरंग कळमकर यांनी उपविभागीय अधिकाना भूसंपादन प्रक्रियेचे पंचनामे खोटे झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. याची सखोल चौकशी करून दुरुस्ती करून घ्यावी, त्याचबरोबर बाबुर्डी येथील अनेक शेतकऱ्यांनी आठ वर्षांपासून आमच्या जमिनीवरती शिक्के टाकले आहेत, यासंदर्भात हरकत असलेली अनेक निवेदने प्रशासकीय अधिकारी यांना दिले असतानाही अद्याप कुठलीही शासकीय कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. जसे की शासकीय अनुदाने, कर्ज प्रकरणे, विस्तारी करणाची प्रगती यावरती कुठलेही संतोषजनक उत्तरे देण्यास असमर्थ ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक अधिकाऱ्यांशी बैठक व्हावी अशी मागणी केली, याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले.

विजय ठुबे, शरद पवळे, दिलीप दिवटे, संतोष दिवटे, पांडूरंग कळमकर, दादाभाऊ दिवटे, सुनील पंदरकर, शिवाजी दिवटे, रामदास कळमकर, प्रल्हाद गाडिलकर, सोमनाथ गाडिलकर, विठ्ठल कळमकरांसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)